गावागावातुन
खरीप हंगामात पीक विमा योजनेत सहभागी व्हा
निरगुडसर प्रतिनिधी- राजु देवडे
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 अंतर्गत भात, बाजरी,सोयाबीन या पिकांचा समावेश आहे. या पिकांचा 1 रुपयात पीक विमा काढण्याची अंतिम मुदत 15 जुलै आहे. विमा संरक्षित रक्कम भात रु.51760, बाजरी रु.24000, सोयाबीन रु. 49000 अशी प्रति हेक्टरी आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा व आपल्या पिकाचे संभाव्य नुकसान टाळावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ यांनी सर्व शेतकऱ्यांना केले आहे. पीक विमा काढण्यासाठी आपल्या जवळच्या सुविधा केंद्रात, राष्ट्रीयीकृत बँकेत किंवा जिल्हा सहकारी बँकेत संपर्क करण्यास सांगितले आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय आंबेगाव यांचेमार्फत तालुक्यातील सर्व गावांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रचार प्रसिद्धी सुरू आहे. मंडळ कृषी अधिकारी सोपान लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरगुडसर मंडळ कार्यक्षेत्रातील 28 गावांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या जनजागृती तसेच शेतकऱ्यांना पीकविमा काढून देण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम सुरू असल्याचे कृषी सहाय्यक प्रवीण मिरके यांनी सांगितले.