गावागावातुन
पूर्व आंबेगावात पावसाची दमदार हजेरी
निरगुडसर प्रतिनीधी -राजु देवडे
आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातील जारकरवाडी, धामणी, पारगाव, पोंदेवाडी, वळती, नागापूर, लोणी, भागडी आदी गावांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.
चातकाप्रमाणे शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. दमदार पाऊस झाल्यामुळे शेतामध्ये अनेक भागात पाणी साचलं होत.
उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. या पावसाने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केलं जातंय.
जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटात पावसाला या परिसरात सुरुवात झाली. यामुळे काही गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता.
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा मिळाला असून खरीपाच्या पेरण्यांना आता वेग येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरड्या शेतीकडे पाहणारा शेतकरी या पावसामुळे सुखावला आहे. बऱ्याच दिवसानंतर त्याच्या चेहेऱ्यावर आनंद दिसला.
जोराचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पूर्व आंबेगावात बरसला .