गावागावातुन
पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाला काठापूर ग्रामस्थांचा विरोध, गावातून महामार्ग न होण्यासाठी ग्रामसभेत ठराव.
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
काठापुर बुद्रुक ( ता. आंबेगाव ) येथे आयोजित ग्रामसभेत काठापुर बुद्रुक गावातून जाणाऱ्या पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गास कडाडून विरोध करत. गावातून हा महामार्ग होऊ नये या याबाबत शासनाला कळवावे असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातून पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग जात आहे हा महामार्ग तालुक्यातील लोणी धामणी खडकवाडी पोंदेवाडी काठापुर बुद्रुक भागडी शिंगवे या गावांमधुन जात आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती बाधीत होत असून, या महामार्गाला विरोध होत आहे. या महामार्गाची रुंदी ही 90 ते 110 मीटर असणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बागायती क्षेत्र या महामार्गामुळे बाधित होणार आहे. काठापुर बुद्रुक हे गाव घोड नदीच्या काठावर वसले असल्याने गाव बारमाही बागायती आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना शेजारीच असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उसाची उपलब्धता आहे.
त्याचप्रमाणे दुग्धव्यवसाय ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केला जातो.सध्या नोकऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने काठापुर मधील मोठ्या प्रमाणावर लोक व तरुण शेती व दुग्धव्यवसाय करत आहे. या आदी ही डिंभे धरण बांधल्यानंतर डिंभे धरणातून बुडीत झालेला शेतकऱ्यांसाठी काठापुर बुद्रुक गावातील मोठ्या प्रमाणावर जमीन शासनाने संपादित केली. त्यामुळे याआधीही काठापुर बुद्रुक गावातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर जमीन धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी संपत्ती झालेले आहेत. त्यामुळे येथील शेतकरी अत्यंत अल्पभूधारक झाला आहे अशा परिस्थितीत पुन्हा एकदा औद्योगिक महामार्गासाठी काठापुर बुद्रुक येथील शेती संपादित होणार आहे. त्याचा मोठा फटका येथील शेतकऱ्याला बसत आहे. त्यामुळे हा औद्योगिक महामार्ग काठापूर बुद्रुक गावातून न होता पर्यायी ठिकाणावरून व्हावा.या महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे काठापुर बुद्रुक या ठिकाणी पार पडलेल्या ग्रामसभेत बाधित होणारे शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपला विरोध नोंदवून औद्योगिक महामार्ग दुसरीकडून व्हावा ही भूमिका घेतली आहे
यावेळी सरपंच अशोक करंडे, उपसरपंच पप्पु खुडे,विशाल करंडे,दादाभाऊ गायकवाड,शोभा जोरी,विमल करंडे,पोलीस पाटील अमोल करंडे,ग्रामसेवक सुवर्णा गोसावी,सुनिल करंडे, संतोष करंडे,बजरंग करंडे,विनायक करंडे,शिवाजी करंडे,बजरंग करंडे,कान्हु करंडे, संतोष करंडे,नवनाथ करंडे,व ग्रामस्थ महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.