गावागावातुन
आंबेगावा तालुक्याच्या पुर्व भागात अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी.
निरगुडसर प्रतिनिधी- राजु देवडे
आंबेगावात तालुक्यातील पुर्व भागातील जारकरवाडी, पोंदेवाडी, लाखणगाव, काठापूर, पारगाव, शिंगवे, नागापूर आदी गावांमध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती विविध कार्यक्रम करून साजरी करण्यात आली.
अहिल्याबाई होळकर यांनी सतीप्रथेला विरोध केला. संपूर्ण भारता मध्ये त्यांनी अनेक मंदिरे व नदी वरील घाट बांधले, बऱ्याच जुन्य मंदिरांचा जीर्णोद्धार केला, व तीर्थक्षेत्र ठिकाणी धर्मशाळा बांधून त्यांनी भाविकांची होणारी गैरसोय टाळली. त्यांनी धर्माच्या नावाखाली असलेल्या अनेक रूढ, अनिष्ट प्रथांना छेद दिला.
अनेक मोठे निर्णय घेऊन ते अंमलात आणले गेले यामुळे अहिल्याबाईं विषयी लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली. यामुळेच दरवर्षी ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहाने साजरी केली जाते. पडदा पद्धतीला विरोध आणि दररोज दरबार भरवून जनतेचे म्हणणे ऐकून तातडीने प्रश्न सोडवणे ही अहिल्याबाईंच्या कामाची खास पद्धत होती.