शेतीशिवार
अवकाळीपावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धांदल
मंचर प्रतिनिधी
अवकाळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडवली असुन. पावसापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी प्लास्टिक कागद ,ताडपत्री खरेदी करून कांदा झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर दुकानांमध्ये गर्दी होत असुन 160 ते 180 रुपये किलो दराने कागद खरेदी करावा लागत आहे.
आंबेगाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडवली असून कांदा झाकण्यासाठी शेतकरी वर्ग प्रयत्न करत आहे.कांदा झाकण्यासाठी प्लास्टिक कागद किंवा ताडपत्री खरेदी करण्यासाठी मंचर, पारगाव या ठिकाणच्या बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.हा पांढरा कागद 120 ते 140 रुपये किलो तर ताडपत्री कलर मधला कागद 160 ते 180 रुपये किलो.या दराने खरेदी करावा लागत आहे. कागद खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड ऊडालेचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.सध्या कांद्याला नसणारा बाजार भाव वाढत असलेला भांडवली खर्च त्यातच अवकाळी पाऊस त्यामुळे खरेदी करावा लागणारे कागद, त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान. या सर्व गोष्टीत शेतकरी वर्ग पिचला असून कांद्याची निर्यात सुरू करावी अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत.