शैक्षणिक
नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेत टाव्हरेवाडी जि.प.शाळेचा. स्वराज टाव्हरे २०० पैकी १९४ गुण मिळवून राज्यात तिसरा
निरगुडसर प्रतिनिधी -राजु देवडे
टाव्हरेवाडी ( ता.आंबेगाव ) येथील जि.प. शाळेतील विद्यार्थी स्वराज नितीन टाव्हरे याने नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेत २०० पैकी १९४ गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. पहिले ते चौथी पर्यंत एकुण १५ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. १४ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहे.
या परीक्षेचा निकाल 100% लागला आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक बाळासाहेब टाव्हरे, आंबेगाव तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष उत्तम टाव्हरे, सुभाष टाव्हरे, बबन टाव्हरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन टाव्हरे, कमलादेवी पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश बांगर,भिमाजी एलभर, तुळशीराम गावडे, भिमाजी टाव्हरे,योगेश राक्षे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. विद्यार्थ्यांना पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सविता माळी, विस्तार अधिकारी काळुराम भवारी, केंद्रप्रमुख कांताराम भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षिका कमल भुरकुंडे यांनी विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचे शाळेचे मुख्याध्यापक महेश शिंदे यांनी सांगितले.