गावागावातुन
आदर्शगाव गावडेवाडीचे दक्षिण मुखी हनुमान मंदिर
शब्दांकन ह.भ.प.मधुकर महाराज गायकवाड पत्रकार गावडेवाडी.
गावडेवाडी फाट्यावर आल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन डेरेदार भाविकांचे स्वागत करणारे वटवृक्ष, रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवीगार झाडी, गावात पोहोचल्यावर कोकणातील जांभ्या दगडाने उभारलेले प्रवेशद्वार, डाव्या बाजूला आकर्षित हिरकणी माध्यमिक विद्यालय ,उजव्या बाजूला येणारा जाणाऱ्यांचे स्वागत करणारी गावची ग्रामपंचायत ,त्याचप्रमाणे जि .प .ची मराठी शाळा शेतात डोलणाऱ्या फळांच्या बागा व गावच्या सीमेवर असणारे हनुमानाचे टुमदार मंदिर हे सुंदर दृश्य आहे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील आदर्श गाव गावडेवाडीचे.
पुण्यापासून अवघ्या ६५ कि .मी . अंतरावर व मंचर पासून अवघ्या पाच ते सात किमी अंतरावर पूर्वेला आदर्शगाव गावडेवाडी हे टुमदार खेडे वसलेले आहे याच गावात सीमेवर दक्षिण मुखी हनुमंताचे जागृत देवस्थान आहे दक्षिण मुखी असल्याने हे अतिशय जागृत देवस्थान आहे त्यामुळे गावकऱ्यांची त्याच्यावर अपार श्रद्धा आहे गावडेवाडीच्या पूर्वजांनी गावच्या सिमेवर हे चौपाखी मंदिर कौलारू मंदिर उभारले मात्र काळाच्या ओघात ते मंदिर जुने झाले होते गावातील साई युवक क्रीडा मंडळाचे व साई युवा फंडाचे तरुण एकत्र येऊन त्यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे ठरवले गावचे प्रवेशद्वार जसे कोकणातील जांभ्या दगडाचे आहे तसेच आपल्या दक्षिणमुखी हनुमंत रायांचे मंदिरही कोकणातील लाल जांभ्या दगडांचे असावे असा विचार सर्वांनी मांडला. पुणे मुंबईत असलेले व गावच्या पंचक्रोशीतून ग्रामस्थांची संमती मिळाली व अल्पावधीतच हे हनुमंत रायांचे आकर्षक चौपाखी जुने स्वरूप जराही न बदलता मनमोहक मंदिर उभे राहिले या मंदिरासाठी साई युवक क्रीडा मंडळाने तनाने मनाने धनाने अहोरात्र कष्ट घेतले. हा हनुमंत राया दक्षिणमुखी असल्याने तो संकटात धावतो व पावतो अशी श्रद्धा असल्याने राज्यभरातून भाविकांची येथे सतत वर्दळ असते. आलेल्या प्रत्येक भाविकाला आपण कोकणात आलो आहोत असा भास होतो. या जागृत हनुमंत राया पुढे नतमस्तक होतो. इकडे येणारे रस्ते अतिशय गडबडीत आहेत हे रस्ते चकचकीत डांबरी व्हावेत व एसटी महामंडळाच्या मंचर आगाराने प्रत्येक तासाला येथे एसटी बस सुरू करावी एवढी माफक अपेक्षा येतील ग्रामस्थांची आहे.
आदर्श गाव गावडेवाडीतील दक्षिण मुखी जागृत हनुमान ही आमची अस्मिता आहे हनुमान व मंदिर हे आमच्या गावाचे वैभव आहे या मंदिराचे पावित्र्य व जाग्रुकता टिकावी म्हणून आमच्या गावातील अबाल वृद्ध सदैव प्रयत्नशील असतात .या हनुमंतरायांची नित्यनेमाने पूजाअर्चा होते असे
विजय धोंडीबा गावडे.सरपंच आदर्शगाव गावडेवाडी.
मी एका साधा शेतकऱ्याचा मुलगा आहे मात्र या हनुमंतावर अपार श्रद्धा . चिकाटी जिद्द नियमित पूजा आरती यामुळे मला बळ मिळाले आहे हनुमंतांच्या श्रद्धेमुळे मी व माझी मुले उद्योजक म्हणून नावारुपास आलो आहोत ही सर्व या दक्षिणमुखी हनुमंतरायाची कृपा आहे असे
दिलीप दत्तात्रय शिंदे ग्रामस्थ व भाविक आदर्शगाव गावडेवाडी.
आदर्श गाव गावडेवाडी येथील नवयुवक क्रीडा मंडळ व साई युवक क्रीडा मंडळ व साई युवा फंड मुंबई यांच्या अथक प्रयत्नाने व अतिशय कष्टाने हे हनुमान रायाचे मंदिर आम्ही उभारले आहे यासाठी मोठा खर्च झाला आहे परंतु गावडेवाडी ग्रामस्थ पुणे मुंबई ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हे होऊ शकले आहे हनुमंत राया वरची अपार श्रद्धा व दक्षिण मुख असलेले मंदिर यामुळे सर्व हे सिद्धीला गेलेले आहे
जयंत नामदेव गावडे
अध्यक्ष साई युवक क्रीडा मंडळ
व मुख्य प्रवर्तक दक्षिण मुखी हनुमान मंदिर आदर्श ग्राम गावडेवाडी