सामाजिक
आंबेगाव राष्ट्रवादी लीगल सेल कडुन नोटरी वकीलांचा सत्कार
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
आंबेगाव तालुका लीगल सेल यांच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील नव्याने नोटरी झालेल्या वकिलांचा सत्कार राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते वळसे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय मंचर येथे संपन्न झाला.
यावेळी बोलताना वळसे पाटील यांनी बरेच दिवसानंतर आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात नोटरी पदी वकिलांची नेमणूक झाल्याने नोटरी वकिलांचा फायदा सर्वसामान्य लोक वकिलांचे पक्षकार यांना करावे लागणारे प्रतिज्ञापत्र तसेच विविध कागदपत्रांच्या सत्यप्रती,विविध नोटरी करारनामे करण्यासाठी होईल. त्यामुळे लोकांचा वेळ पैसा वाचेल त्यामुळे सर्वसामान्य लोकांना आधार मिळेल असे मत वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
तसेच घोडेगाव न्यायालयातील पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. यापुढील काळात वकिलांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील असे यावेळी सांगितले. सर्व नोटरी वकीलांना यावेळी वळसे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
नोटरी पदी नियुक्ती झालेले सदस्य ॲड.प्रमोद काळे, ॲड.श्रीकांत काळे,ॲड.विलास शेटे, ॲड.विनोद चासकर ॲड.चेतन उदावंत ॲड.दीपक लोहोटे ॲड.वैशाली बांगर ॲड.अनिता पोखरकर ॲड.राजश्री करंडे ॲड.ज्योती खेसे ॲड माऊली श्रीरसागर ॲड दीपक लायगुडे ॲड सुदाम मोरडे इ.नोटरी वकिलांचा सत्कार वळसे पाटील यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लीगल सेलचे अध्यक्ष ॲड निलेश शेळके यांनी केले. आभार ॲड हनुमंत पर्वत यांनी मानले.