गावागावातुन
वाळुंज कुटूंबियांकडुन गाथा मंदिरासाठी ५१००० रू.देणगी.
निरगुडसर प्रतिनिधी- राजु देवडे
पोंदेवाडी ( ता.आंबेगाव ) येथील वै. किसन ठकाजी वाळुंज यांचे स्मरणार्थ श्रीमती यमुनाबाई किसन वाळुंज यांनी श्री क्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज गाथा मंदिरासाठी बांधकाम निधी म्हणून ५१००० रू. देणगी गाथा मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले यांच्याकडे सुपूर्द केल्याचे आंबेगाव तालुका ख.वि.संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सांगितले.
देशातील प्रत्येक राज्याची स्वतःची अशी वेगळी परंपरा आणि या प्रत्येक राज्याचा सांस्कृतिक केंद्रे म्हणून धार्मिक-सामाजिक जबाबदारी निभावणाऱ्या अनेक मंदिरांचा समृद्ध असा इतिहास आहे.भारतातही अनेक मंदिरे आहेत, जी दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटकांना आकर्षित करतात. मंदिरे ही भारतातील अशी आध्यात्मिक स्थळे आहेत, जिथे लोक शांती मिळवण्यासाठी येत असतात.
श्रीक्षेत्र देहु येथील गाथा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग कोरण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे येथे अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात गाथा मंदिरात विविध उपक्रम राबवले जातात या.या कामासाठी पोंदेवाडी ( ता.आंबेगाव ) येथील वै. किसन ठकाजी वाळुंज यांचे स्मरणार्थ श्रीमती यमुनाबाई किसन वाळुंज यांनी श्री क्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज गाथा मंदिरासाठी बांधकाम निधी म्हणून ५१००० रू. देणगी गाथा मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले यांच्याकडे सुपूर्द केली आहे.