शैक्षणिक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमणबेट पारगाव (शिगंवे)शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
मंचर प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमणबेट ता.आंबेगाव या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. उंडे सर यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी सरपंच श्वेता ढोबळे, उपसरपंच नितीन ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य गीतांजली लोंढे, अंकिता लोखंडे, गौरी ढोबळे, लता ढोबळे,राजश्री ढोबळे, विठ्ठल ढोबळे, वीरेंद्र ढोबळे, बाळासाहेब ढोबळे,बाळासाहेब लोखंडे, मुख्याध्यापक लबडे सर आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
बबनराव ढोबळे , निलेश शेळके, केंद्रप्रमुख कांताराम भोंडवे , विजय वळसे सर यांनी मनोगते व्यक्त केली. शाळेचा शैक्षणिक दर्जा उत्तम असून शाळेमध्ये विविध उपक्रम उत्साहाने राबवले जातात. दोन्हीही शिक्षक होतकरू असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यतत्पर असतात असे श्री. भोंडवे म्हणाले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश ढोबळे व सर्व सदस्यांनी योगदान दिले.
मुख्याध्यापक श्री. उंडे सर व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पहिल्यांदा आपल्या शाळेत राबविला गेला, याबाबत ग्रामस्थांनी मनोगतातून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋचा उंडे व आराध्या ढोबळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. पालकांनी टाळ्या वाजवून व देणगी देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे आभार किरण ढोबळे यांनी मानले. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.