शैक्षणिक
माजी विद्यार्थ्यी हितेश ढोबळे यांचा निमणबेट शाळेकडून गौरव.
मंचर प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमणबेट पारगाव(शिगंवे) ता.आंबेगाव शाळेत. शाळेचा माजी विद्यार्थी हितेश ढोबळे यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची राज्य कर निरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळवल्याने शाळेकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, आपण काहीतरी वेगळं करावं, अशी उर्मी त्यांच्यात जागृत व्हावी, लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करावे, बाल मनातच या परीक्षांविषयी माहिती मिळावी. असेच काहीतरी करावे, अशी प्रेरणा व प्रोत्साहन विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने हा उपक्रम शाळेत घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री.उंडे सर यांनी केले. मनोगतातून हितेश यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उराशी मोठी स्वप्न बाळगा. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. न डगमगता, न हारता सतत प्रयत्नशील रहा. प्रयत्नांत सातत्य ठेवा, तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. असा संदेश त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश ढोबळे, उपाध्यक्ष सौ.सुरेखा ढोबळे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अशोक ढोबळे, कैलास ढोबळे,सुवर्णा ढोबळे त्याचबरोबर हितेशचे वडील ज्ञानेश्वर ढोबळे व भाऊ दयानंद ढोबळे, बहिण काजल ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपशिक्षिका चंद्रप्रभा अरगडे यांनी आभार व्यक्त केले.