महाराष्ट्र
पंढरपूरच्या सप्ताहाची दहीहंडी फोडून सांगता.
मंचर प्रतिनिधी
माऊलीच्या पायी वारी सोहळ्यातील अजामेळा दिंडी क्रमांक २६ च्या वतीने पंढरपूर येथील श्री पांडुरंग रुक्मिणी मंदिराजवळील तुकाराम भवन येथे मंगळवार (ता. १२ )ते मंगळवार (ता . १९ )असा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला .या सप्ताहाची सांगता संगीत अलंकार . ह भ प भीमाताई ज्ञानेश्वर लोंढे /गायकवाड यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.
या सप्ताहाचे संयोजक पत्रकार ह.भ.प.मधुकर महाराज गायकवाड यांच्या हस्ते दहीहंडी फोडून करण्यात आली असल्याचे या सप्ताहाचे संयोजक अजामेळा दिंडी क्रमांक चे उपाध्यक्ष अवसरी खुर्द ता आंबेगाव येथील बबनराव मारुती राजगुरू व पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली.
अध्यात्माला भक्तीची सांगड घातली पाहिजे व विज्ञानाला अध्यात्माची सांगड घातली पाहिजे तर सामान्य माणसाचे जीवन जगणे सुसह्य होते असे प्रतिपादन संगीत अलंकार सौ भीमाताई ज्ञानेश्वर लोंढे / गायकवाड यांनी काल्याच्या कीर्तनात मांडले
या सप्ताहामध्ये पहाटे काकड आरती भजन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी एक ते तीन ह भ प बाळासाहेब महाराज गायकवाड (वळती ता . आंबेगाव ) यांची श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी प्रवचन हरिपाठ व रात्री साडेसात ते नऊ वाजता वारकरी सांप्रदायिक श्री हरी कीर्तने संपन्न झाली या सप्ताहात संजीवनीताई भावेश मंडलिक ( लांडेवाडी )प्राचार्य डॉ पांडुरंग निवृत्ती महाराज गायकवाड ( मंचर ) ह भ प किशोर महाराज उगले (बीड) धोंडीभाऊ महाराज शिंदे गुरुजी (अवसरी खुर्द ) हभप दिपक महाराज टेंबेकर (अवसरी खुर्द ) ह भ प श्रीकांत महाराज बेल्हेकर गणेशवाडी (ता. नेवासा )ह भ प अर्जुन महाराज पंचराज (लोणी )ह भ प पंढरीनाथ तांबे सर (अवसरी खुर्द )यांची प्रवचन रूपाने सेवा झाली.
तर या सप्ताहात ह . भ .प . सिद्धीताई विनायक गावडे (आदर्शगाव गावडेवाडी )ह भ प दीनानाथ महाराज शिंदे (आदर्शगाव गावडेवाडी ) ह भ प अशोक महाराज हाकाळे (गेवराई बीड ) ह भ प दत्तात्रय महाराज रुकारी (कोलारवाडी ता . आंबेगाव ) ह भ प नामदेव महाराज वाळके वेळेश्वर मंदिर संस्थान ( भावडी )ह .भ. प . आदिनाथ महाराज जुन्नरकर ( खडकी पिंपळगाव ) यांची वारकरी सांप्रदायिक श्रीहरी कीर्तने संपन्न झाली.
या सप्ताहाची सांगता ह . भ.प .संगीत अलंकार सौ भीमाताई ज्ञानेश्वर लोंढे (वारू ता . मावळ ) यांचे सकाळी नऊ ते अकरा वाजता काल्याचे किर्तन होऊन संयोजक पत्रकार ह भ प मधुकर महाराज गायकवाड यांच्या हस्तेदहीहंडी फोडून या सप्ताहाची सांगता करण्यात आली सप्ताहाला राज्यभरातून भाविकांची गर्दी झाली होती शेकडोभाविकांनी या श्रवण सुखाचा आनंद घेतला असल्याचे अजामेळा दिंडी क्रमांक २६ च्या वतीने व संयोजक ह. भ प मधुकर महाराज गायकवाड यांच्या वतीने सांगाण्यात आले
श्री क्षेत्र पं
ओ