गावागावातुन
विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या युवकांचा पोंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार.
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
पोंदेवाडी (तालुका आंबेगाव) येथील युवकांनी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यश मिळवले या युवकांची गावातुन मिरवणूक काढुन सन्मान पोंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
विविध शासकीय विभागांच्या वतीने विविध विभागांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये गणेश विठ्ठल मखर यांची रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून, अजिंक्य केरभाऊ घोलप यांची कृषी सेवक पदी, किरण कुशाभाऊ पाचारणे यांची कोल्हापूर येथे वनरक्षक पदी,तर अनिकेत घोलप यांची बँकेत क्लर्क म्हणुन निवड झाली.या युवकांचा सन्मान पोंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूंज, उपसरपंच महेंद्र पोखरकर ,माजी सरपंच जयसिंग पोंदे,संदिप पोखरकर, सुशांत रोडे ,अमोल वाळुंज , अशोक वाळुंज ,आनंदराव पोंदे ,अर्जुन महाराज वाळुंज, भाऊसाहेब पोंदे, वसंत रोडे,विठ्ठल मखर,नानाभाऊ पोखरकर , संतोष पोखरकर, नितीन पोंदे ,विशाल जाधव,संदेश डुकरे, निलेश दौंड , प्रमोद पोंदे , अमित दौंड
यांसह यशस्वी युवकांचे कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील युवकांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. तसेच इथून पुढच्या कालखंडामध्ये जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतील त्यांना सर्व सहकार्य पोंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल असे खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज म्हणाले.