सामाजिक
जारकरवाडी येथे वडजादेवी यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन.बैलगाडा शर्यतीसाठी नवीन घाट.
निरगुडसर प्रतिनिधी- राजु देवडे
जारकरवाडी ( ता.आंबेगाव ) येथे ग्रामदैवत वडजादेवी यात्रेनिमित्त सोमवार ( दि.१८ ) व मंगळावर ( दि.१९ ) रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून बैलगाडा घाटासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. सदर घाटा सुसज्ज बांधण्यात आला असून बैलगाडा मालकांनी मोठ्या संख्येने यात्रेसाठी बैलगाडा आणावेत असे आवाहन जारकरवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
प्रथम क्रमांक येणाऱ्या बैलगाड्यासाठी ५१००१ रु. द्वितीय क्रमांक ४१००१, तृतीय क्रमांक ३१००१, चतुर्थ क्रमांक १५००१ रू. याप्रमाणे बक्षिसे असून घोड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.दि.(१८) रोजी विठ्ठल कृपा कला नाट्य भारुड मंडळ यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. तर दि.(१९ ) रोजी तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.