गावागावातुन
पोंदेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग बांधवांना निधी वाटप
निरगुडसर प्रतिनिधी- राजु देवडे
पोंदेवाडी ( ता.आंबेगाव ) येथील ग्रामपंचायत च्या वतीने 17 दिव्यांग बांधवांना प्रत्येकी साडेतेवीशे रुपयांचा निधी वाटप करण्यात आल्याचे सरपंच निलमताई वाळुंज यांनी सांगितले
दिव्यांग निधी मिळाल्यामुळे दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले भविष्यात दिव्यांग बांधवांसाठी विविध प्रकारच्या शासकीय योजना राबवण्यात येणार असल्याचे सरपंच वाळुंज यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ख.वि.संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर, भाऊसाहेब पोंदे, शुभम वाळुंज यावेळी उपस्थित होते