गावागावातुन
निरगुडसर येथे किर्तनकार महाराजांचा सन्मान
निरगुडसरप्रतिनिधी- राजु देवडे
अध्यात्मिक व वारकरी आघाडी आणि स्वप्निल फाउंडेशन काठापुर बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त व जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील शिवचरित्रावर कीर्तन करणार्या कीर्तनकार व शिवचरित्रकार यांचा सन्मान करुन. गौरविण्यात आले.
निरगुडसर ता.आंबेगाव येथील बेटवस्ती येथे हा सन्मान सोहळा पार पडला.संपूर्ण महाराष्ट्रातल अनेक कीर्तनकार या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ह.भ.प.गोरक्षनाथ टाव्हरे व रामदास करंडे यांनी केले होते. या वेळी प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर महाराज जळगावकर मंदिर समिती सदस्य पंढरपूर त्याचप्रमाणे नामदेव महाराज वाळके, दत्तात्रय महाराज रुकारी, जालिंदर महाराज करंडे, बारीकराव महाराज गायकर, रवींद्र वळसे सरपंच निरगुडसर,अशोक करंडे सरपंच काठापुर,गोरक्षनाथ टाव्हरे,रामदास करंडे हे उपस्थित होते.
ह.भ.प.मोहनानंद महाराज पुरंदवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सूत्रसंचालन अर्चना करंडे नीलिमा वळसे यांनी केले आभार विशाल करंडे यांनी मानले.