गावागावातुन
महाशिवरात्री यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव)येथे आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये लहू लक्ष्मण पोळ (कवठे) व भागा नाना बांगर हे बैलगाडे प्रथम क्रमांकाचे फळीफोडचे मानकरी ठरले.
निरगुडसर प्रतिनिधी (राजु देवडे)
काठापुर बुद्रुक या ता.आंबेगाव या ठिकाणी महाशिवरात्र यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखंड हरिनाम सप्ताह ,बैलगाड्यांच्या शर्यती ,कलगीतुरा ,नाटक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये लहू लक्ष्मण पोळ (कवठे) व भागा नाना बांगरबांगर यांचे बैलगाडे प्रथम क्रमांकाचे फळीफोडचे मानकरी ठरले तर घाटाचा राजा व सागर सोनवणे ,सुनील पोखरकर व सुभाष वाळुंज,अंकुश दाते यांच्या गाड्यांनी घाटाचा राजा हा किताब मिळवला.
फायनल मध्ये प्रथम क्रमांक कचरूशेठ पानमंद व सागर सोनवणे ,सुनील पोखरकर यांच्या गाड्याने मिळवला. फायनलमध्ये द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज अंकुश दाते.यांच्या गाड्याने मिळवला तर फायनल मधे तिसरा क्रमांक दीपक पोखरकर (सरपंच पिंपळगाव) व सयाजी गावडे नारोडी यांच्या गाड्याने मिळवला.
या बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
बैलगाडा शर्यतींच्या आयोजनामध्ये यात्रा कमिटीचे अध्यक्ष नवनाथ लोंढे, उपाध्यक्ष संतोष करंडे, सचिव मंगेश करंडे, सरपंच अशोक करंडे,पप्पू खूडे, विशाल करंडे,सुनिल करंडे ,बजरंग करंडे ,राहुल भुरके,सागर हुले,अशोक जोरी,किशोर करंडे,राजु जोरी कमलेश नरवडे,काळुराम टिंगरे,लक्ष्मन करंडे,ओंकार पवार,शिवाजी करंडे,महादेव करंडे,गणेशकरंडे,मनोज करंडे,किरण जाधव यांनी काम पाहिले.
या यात्रा उत्सवाला बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम ,कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले,रामचंद्र ढोबळे,पारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे ,यांसह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनीही भेट दिली.