गावागावातुन
काठापूर बुद्रुक येथे वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमण मोठ्या बंदोबस्तात वनविभागाने हटविले.
निरगुडसर प्रतिनिधी (राजु देवडे)
काठापुर बुद्रुक ( ता.आंबेगाव ) येथे वनविभागाच्या हद्दीतील गट.नं.१४५ मधील २० हेक्टरवरी घरे ,कोप्या व शेतीचे अतिक्रमण हटवल्याचे मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी सांगितले.
२०१९ मध्ये या ठिकाणी काही लोक वास्तव्यास आले होते. त्यांनी वनविभागाच्या हद्दीत जमीन कसण्यास सुरुवात करून ज्वारी,केळी, जनावरांचा चारा ही पिके घेण्यास सुरुवात केली होती.त्यानंतर त्यांनी आपले दावे ग्रामस्तरीय, जिल्हास्तर, उपविभाग स्तरावर दाखल केले होते. परंतु हे दावे फेटाळण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या वतीने दि. (६) रोजी उपवनसंरक्षक जुन्नर अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक संदेश पाटील,सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांच्या उपस्थितीत हे अतिक्रमण हटवण्यात आले.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई पथक उपलब्ध करून देण्यात आले होते.
यावेळी खेड वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंधळ, घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गारगोटे, ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक उपस्थित होते.
खेड उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या उपस्थितीत मंचर पोलिस स्टेशनचे पी.एस.आय अरुण फुगे, पारगाव ( कारखाना) पोलीस स्टेशनचे स.पो.नि.नेताजी गंधारे स.पो.नि बालाजी कांबळे,पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे,सोमेश्वर शेटे यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी तेरा कुटुंबांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले.यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी वनविभागाचे मोठा प्रमाणावर कर्मचारी उपस्थित होते.
अतिक्रमण काढण्यासाठी जेसीबी, ट्रॅक्टर,पिकअप, टेम्पो ,यांचा वापर करण्यात आला.यावेळी ॲम्बुलन्स व अग्निशमन बंब सुद्धा उपलब्ध करण्यात आले होते.यावेळी स्थानिक वनपाल सोनल भालेराव, वनरक्षक साईमाला गिते.व कर्मचारी उपस्थित होते.