शैक्षणिक

विठ्ठलवाडीत भरला आनंदी बाजार

Published

on


मंचर (प्रतिनिधी)

विठ्ठलवाडी ता आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रथमच विद्यार्थ्यांच्या वतीने आनंदी बाजाराचे नियोजन केले होते विद्यार्थ्यांना गणिती क्रियांचे प्रत्यक्ष व्यवहार समजावे तसेच आपल्या मालाची जाहिरात करणे तो योग्य किमतीला विकणे ही कौशल्य आत्मसात व्हावी या मुख्य उद्देशाने या बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.
या बाजाराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक अरुण शंकर चिखले यांच्या हस्ते सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले.बाजारात विद्यार्थ्यांनी शेतातून आणलेला भाजीपाला,फळे, पालेभाज्या आणि खाऊ गल्लीत घरी बनवलेले विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते.

या उपक्रमात सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला व विद्यार्थ्यांकडून सर्व प्रकारचा भाजीपाला खरेदी केला व खाऊगल्लीचाही आनंद लुटला.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री देवेंद्र वायाळ व सर्व सदस्य,पोलीस पाटील श्री. राजेंद्र चिखले,सरपंच सौ. ललिता ताई चिखले, उपसरपंच श्री.सुहास चिखले,ग्रामसेवक श्री. जितेंद्र वाकडे व विविध संस्थांचे पदाधिकारी,ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बाजाराचे नियोजन मुख्याध्यापिका मधुरा वैष्णव व उपशिक्षिका श्रीमती मृणाली झुंजार यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version