गावागावातुन
जारकवाडी येथे नवीन बैलगाडा घाटाच भुमीपूजन
निरगुडसर प्रतिनिधी- राजु देवडे
जारकवाडी ( तालुका आंबेगाव) येथे गावच्या वतीने नवीन जागेत बैलगाडा घाटाचे भुमीपूजन करण्यात आले. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैलगाडा घाटासाठी दहा लक्ष रु. निधी मंजूर झाला असून भुमीपूजन जि.प.माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भीमाशंकर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, माजी संचालक विलास लबडे , सरपंच प्रतीक्षा बढेकर, उपसरपंच कौसल्या भोजने, सचिन टाव्हरे, सोसायटी चेअरमन सुर्यकांत लबडे, माजी चेअरमन खंडु भोजने, ग्रामपंचायत सदस्य शाम बढेकर, सुरेश मंचरे, श्रावण काकडे, अलका कापडी, रुपाली कजबे, एकनाथ भांड, माजी सरपंच शरद भोजने, संतोष ढोबळे, प्रदीप ढोबळे, विलास ढोबळे, शरद वैद, युवराज लबडे, समीर ढोबळे, विकास ढोबळे,नवनाथ मंचरे गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.