शेतीशिवार
डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडले अनेक गावांंतील शेतीपिकांना होनार फायदा.
मंचर प्रतिनिधी
डिंभे धरण (हुतात्मा बाबु गेणु जलाशयातून) उजव्या कालव्याला पाणी सोडल्यामुळे आंबेगाव-शिरूर तालुक्यातील सुमारे ६० गावातील शेतीपिकांना फायदा होणार आहे. पाण्याचे आवर्तन अंदाजे एक महिना चालणार आहे. आंबेगाव, शिरूर, तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न भेटसावू लागला होता.याबाबत उजव्या कालव्या लगत असलेल्या शेतकऱ्यांकडून कालव्याला पाणी सोडण्याची मागणी होत होती.तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाणी सोडण्याबाबत निवेदन दिले होते. या संदर्भात आज पुणे येथे उपमुख्यमंत्री तथा कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी डिंभे धरण तसेच घोड व मीना शाखा कालव्यात उन्हाळी हंगामातील पिकाच्या सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सद्या डिंभे धरणात ६४.६४ टक्के पाणीसाठा असुन उजव्या कालव्याला शनिवारी (ता. २४ ) रोजी १२ वाजता पाणी सोडण्यात आलेअसल्याचे शासकीय उपविभागीय अभियंता दत्ता कोकणे यांनी सांगितले.या पाण्यामुळे आंबेगाव तालुक्यातील नारोडी, लांडेवाडी, मंचर, अवसरी खुर्द, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, खडकवाडी व शिरूर तालुक्यातील सविंदणे, कवठे, मलठण, सोनसांगवी इत्यादी गावांना पाण्याचा फायदा होणार आहे.पाण्याचे आवर्तन अंदाजे जवळपास ३० दिवसांहून अधिक चालणार असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. तीव्र उन्हामुळे विहीर आणि पाझर तलावातील पाणी झपाट्याने कमी होऊ लागले होते. त्यामुळे ऐन पाणी टंचाईच्या काळात पाणी सोडल्याने शेतीपिकांना दिलासा मिळणार आहे. कालव्यात पाणी नसल्याने अनेक शेती पिके जळून जाण्याच्या मार्गावर होती मात्र आता पाणी आल्याने शेती पिकाचा जीवदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व आनंद व्यक्त केला आहे.