शैक्षणिक
काठापूर (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आयोजित बाल आनंद बाजार उत्साहात संपन्न.
मंचर प्रतिनिधी
काठापुर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आयोजित बाल आनंद बाजार उत्साहात संपन्न झाला.या वेळी ओनलाईन पद्धतीने व्यवहार करण्यात आले. विद्यार्थ्यांना ओनलाईन पद्धतीने व्यवहाराचे धडे देण्यात आहे.
यावेळी भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले,सरपंच अशोक करंडे, कुंडलिक जोरी,पप्पू खुडे,विशाल करंडे, राहुल भुरके,काळुराम टिंगरे,मंगेश करंडे,नवनाथ लोंढे,कमलेश नरवडे, संतोष करंडे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर व्यवहारज्ञानाची ओळख बालदशेतच व्हावी यासाठी शाळेतर्फे बालजत्रेचे आयोजन केले होते.
या बाजारात विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने विविध स्टॉल लावले होते. यामध्ये पालेभाज्या, फळे, पाणीपुरी, मिसळ, इडली सांबर, गुलाबजाम, ओली भेळ, भजी पाव, दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे स्टॉल लावले होते. काहींनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. या सर्व वस्तूंची खरेदी करण्यासाठी पालक ग्रामस्थ व महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
आपल्या सर्व वस्तू विकल्या गेल्याचा आनंद विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार चासकर सर यांनी दिली. नीलिमा वळसे, उत्तम वाव्हळ, दिनेश तुळे, सुरेश भागवत व शिक्षकांनी यासाठी विदयार्थ्यांना मदत केली. अवघ्या दोन तासात बाजारात २५ हजारांची उलाढाल झाली.