गावागावातुन
पोंदेवाडीच्या यात्रे निमित्ताने बैलगाडा शर्यतींसह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
मंचर प्रतिनिधी
पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील श्री. गडदादेवी यात्रा सोमवार (दि.२६) व मंगळवार (दि. २७) या दोन दिवशी साजरी होणार असून या निमित्त बैलगाडा शर्यत, कुस्त्यांचा आखाडा, तमाशा व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बैलगाडा शर्यतीसाठी यावर्षी नवीन सुसज्ज घाट बनवला असल्याची माहिती आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी दिली.
मंगळवार दि. २७ रोजी सकाळी ९ वाजता देवीला चोळी पातळ, शेरणी वाटप, काठी मिरवणूक, दुपारी चार वाजता कुस्त्यांचा आखाडा, रात्री ९ वाजता भिका भीमा सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.
खास यात्रेसाठी नवीन जागेत नवीन बैलगाडा घाटाचे सुसज्ज असे बांधकाम करण्यात आलेले आहे. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून घाटाच्या कामासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर झाला व गावातून सुमारे पाच लाख रुपये लोक वर्गणीतून जमा केले असल्याचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी सांगितले.