शेतीशिवार
आंबेगाव व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची सहकार मंत्र्यांकडे मागणी
मंचर प्रतिनिधी
आंबेगाव व शिरूर तालुक्यातील ४५ गावातील शेती पिके उजव्या कालव्याला पाणी नसल्याने धोक्यात आली आहेत. उजव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूंज यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
आंबेगाव व शिरूर तालुक्यातील ४५ गावातील ऊस, कांदा, चारा पिके तरकारी पिके, पालेभाज्या सध्या सुकू
लागले आहेत. शेततळी तसेच पाझर तलाव, तळी, ओढे, नाले कोरडे पडले आहेत. विहिरींचे पाणी पातळी खालवली आहे. त्यामुळे पिके जगवायला कालव्याला पाणी सोडणे अत्यंत गरजेचे आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच ऊन्हाची
तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागल्याने सहा ते सात दिवसात शेती पिकांना पाणी द्यावे लागते.
अन्यथा पिके सुकून जातात. सध्या शेतात उभी असणारी पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. त्यामुळे डिंभे उजव्या
कालव्याला पाणी सोडणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. कारण यावर्षी धरणात असणारा पाणीसाठा व उन्हाची वाढणारी तीव्रता यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज निर्माण होणार आहे. त्यामुळे पाण्याचा वापर योग्य पद्धतीने केला नाही, तर मात्र एप्रिल, मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या संकटाला सामोरे जाऊ लागू शकते