गावागावातुन
लोणी मॅरेथॉन २०२४ उत्साहात संपन्न.
निरगुडसर प्रतिनिधी (राजु देवडे)
लोणी ( ता.आंबेगाव ) येथे रविवारी (दिः११) रोजी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली.ही स्पर्धा ३ किमी,५ किमी,१० किमी आणि २१ किमी अशा चार प्रकारांत महिला व पुरुष अशा गटात ही स्पर्धा पार पडली.माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी, फ्रीरनर्स फाऊंडेशन यांनी या स्पर्धेचे आयोजक आणि प्रायोजक होते.याप्रसंगी स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी सैराट चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री स्नेहल भोंग उपस्थित होते.
यावेळी विजयी स्पर्धकांना रोख बक्षिसे देण्यात आली.याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.पराग काळकर, पुणे जिल्हा भाजप किसान सेनेचे अध्यक्ष संजय थोरात,पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील,गृह मंत्रालयातील सहसचिव कैलास गायकवाड,माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयसिंह वाळुंज, डी.वाय.पाटील विद्यापीठाचे समूह संचालक विद्यानंद मानकर, सुभेदार मेजर सुभाष पालेकर पाटील, पोंदेवाडीचे सरपंच अनिल वाळुंज,लोणीचे सरपंच डॉ.सावळेराम नाईक हे उपस्थित होते.
२१ किलोमीटर मध्ये दयाराम गायकवाड नाशिक, प्रशांत पाटील लातूर, शितल भंडारी अळकुटी,अंकिता शिंदे अवसरी, पल्लवी जाधव खंडाळा ,१० किलोमीटर मध्ये सागर सदगीर,प्रदीप राजपूत, देविदास गायकवाड, साक्षी भंडारी, ऋतुजा माळवतकर, कोयल खपाले ,पाच किलोमीटर मध्ये आकाश लोटे, सौरभ गटकर,आर्या काळे, प्रिया गुळवे,साक्षी राजे, तीन किलोमीटर मध्ये, वेदांत त्रिकोणे ओम शेळके, दत्तप्रसाद पाटील, साक्षी बोराडे, अंजली काळे, कोमल वाळुंज, व शालेय अनेक विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवली.
या स्पर्धेत २८ प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक व वरिष्ठ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. तसेच सीआरपीएफ दौंड, खंडाळा ट्रेनिग सेंटरच्चा मूली व पंचक्रोशीतील नागरीकांनी उत्सूपूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे संयोजन माजी विद्यार्थी, ग्रामपंचायत लोणी व सर्व ग्रामस्थ यांनी केले.तर सूत्रसंचालन डॉ.अविनाश वाळुंज आणि मयूर लोखंडे यांनी केले.