राजकीय
जारकरवाडी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी सुभाष भोजने
निरगुडसर प्रतिनिधी (राजु देवडे)
जारकरवाडी ( ता.आंबेगाव ) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी सुभाष मारूती भोजने यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. मावळते उपाध्यक्ष बाळु शंकर लबडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदावर ही निवड करण्यात आली.
सदर निवड मंचर येथे पुणे जि.मध्य. बँकेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी संस्थेचे चेअरमन सुर्यकांत लबडे, माजी चेअरमन खंडु भोजने, माजी सरपंच रूपाली भोजने, माजी उपसरपंच शरद भोजने, डी डी भोजने, रसिक भोजने, आनंदा भांड, एकनाथ भोजने, आनंदा भोजने, जालिंदर भोजने, रमेश वणवे, व सर्व संचालक उपस्थित होते. उपाध्यक्षपदी निवड झालेल्या भोजने यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी व्ही वाघमारे यांनी काम पाहिले तर संस्थेचे सचिव नवनाथ मंचरे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.