सामाजिक
धामणीच्या म्हाळसाकांत मंगल कार्यालयात ३१ विविध सोहळे समारंभाचे कार्यक्रम संपन्न.
निरगुडसर (राजु देवडे)
पुणे,नगर व नाशिक जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असलेल्या धामणी (तालुका आंबेगांव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानाच्या मंदिरासमोर लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या “कुलस्वामी” हाॅलमध्ये मागील दोन वर्षात (२०२२ व २०२३)तीस साक्षीगंध.साखरपुडा आणि विवाह सोहळे संपन्न झाले असल्याची माहीती ग्रामस्थ व खंडोबा देवाच्या सेवेकरी मंडळीनी दिली श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान
येथील कुलस्वामी हाॅल पंचक्रोशीतील भाविकांच्या व ग्रामस्थाच्या मुलामुलींच्या लग्नकार्याला व धार्मिक कार्यक्रमाला विनामूल्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय धामणी ग्रामस्थांनी घेतलेला आहे . हाँलच्या शेजारी देवाच्या दर्शनासाठी व मंदिरात धार्मिक कुलधर्म कुलाचार कार्यक्रम व देवकार्य करण्यासाठी येणार्या भाविकांसाठी व विवाह सोहळा कार्यक्रमासाठी येणार्या वर्हाडी मंडळीसाठी भव्य भोजन हाॅल,वधूवर कक्ष,स्वच्छतागृहे.व आकर्षक प्रवेशद्बार बांधण्यात येणार असून त्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती धामणी ग्रामस्थ व खंडोबा देवस्थानांचे मुख्य पुजारी दादाभाऊ भगत यांनी सांगितले.