सामाजिक

शिरदाळे घाटात पुन्हा भीषण अपघात ग्रामस्थांकडुन रस्त्याच्या शेजारी सिमेंट कठडे बांधण्याची मागणी.

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी-( राजु देवडे)

शिरदाळे ( ता . आंबेगाव ) येथील शिरदाळे धामणी घाटात ( दि.४ ) मध्यरात्री अपघात झाला. यामध्ये टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून दैव बलवत्तर म्हणून चालक आणि वाहक तसेच बटाटा व्यापारी यात बचावले.

गुळणी ( ता.खेड ) येथून बटाट्याने भरलेला हा टेम्पो श्रीगोंदा या ठिकाणी चाललेला असल्याची माहिती समजत आहे.साधारण मध्यरात्री एकच्या सुमारास बटाट्याने भरलेला टेम्पो शिरदाळे घाटात पलटी झाला.यात टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून चालक, वाहक तसेच व्यापारी थोडक्यात बचावले अशी माहिती नजीक राहायला असणारे धामणी येथील बाळासाहेब बोऱ्हाडे,विक्रम बोऱ्हाडे,सीमा बोऱ्हाडे यांनी दिली.

गेल्या वर्षभरातील हा तिसरा ते चौथा मोठा अपघात असून शिरदाळे ग्रामपंचायत,धामणी ग्रामपंचायत यांच्या वतीने वारंवार सिमेंट कठडे बसवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यात येत असून त्याकडे दुर्लक्ष केले जात असून आता पुन्हा दोनही ग्रामपंचायच्या वतीने सबंधित विभागाला निवेदन देण्यात येणार असून कोणाचा जीव जाण्याची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पाहत आहे का असा संतप्त सवाल धामणी गावच्या सरपंच रेश्मा बोऱ्हाडे,शिरदाळे गावच्या सरपंच जयश्री तांबे,उपसरपंच बिपीन चौधरी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.

मध्यरात्रीच्या वेळ असताना देखील अपघाताची माहिती सरपंच रेश्मा बोऱ्हाडे यांना समजताच त्यांचे पती अजित बोऱ्हाडे घटनास्थळी लगेच दाखल होऊन त्यांनी अपघातग्रस्तांना उपचारासाठी पारगाव येथे दवाखान्यात दाखल केले. त्यातील एकाला गंभीर दुखापत असून दोघांना किरकोळ दुखापत आहे.परंतु वारंवार अपघात होत असताना संबंधित विभागाने याची त्वरित दखल घ्यावी आणि सिमेंट कठडे बसवण्याची मागणी मान्य करून त्वरित काम चालू करावे अशी मागणी शिरदाळे माजी उपसरपंच मयुर सरडे यांनी केली आहे.

या रस्त्याचे काम झाल्यापासून या रस्त्याने वर्दळ वाढली आहे. शिरदाळे येथील शाळेतील मुलं,महिला मजूर,शेतकरी यांची कायच वर्दळ या रस्त्याला असते आम्ही दोनही ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभागाला पुन्हा निवेदन देणार असून आता तरी दखल घेऊन हे काम मार्गी लावावे.अशी माघणी रेश्मा बोऱ्हाडे सरपंच धामणी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version