शैक्षणिक
महाळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गेनू विद्यालयाला ‘ए’ श्रेणी
निरगुडसर प्रतिनिधी -(राजु देवडे)
महाळुंगे पडवळ : महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील हुतात्मा बाबू गेनू विद्यालया व श्री.वि. ग. कापुसकर कनिष्ठ महाविद्यालयाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनला आहे. ‘ए’ श्रेणी प्राप्त झाल्याने शिक्षक, पालकांची जबाबदारी वाढली आहे, असे मत प्राचार्य साहेबराव काळे यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारे शाळा मूल्यांकना व स्तर निश्चिती मध्ये हुतात्मा बाबू गेनू विद्यालयाला ‘ए’ श्रेणी प्राप्त झालेली आहे. हे विद्यालय आंबेगाव तालुक्यातील चतुर्थ ठरले आहे, तर पुणे जिल्ह्यातून या विद्यालयाने ३३ वा क्रमांक प्राप्त केलेला आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या हस्ते व शिक्षण उपसंचालक अहिरे, माध्यमिकचे शिक्षण अधिकारी कमलाकर म्हेत्रे, प्राथमिकच्या0 शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे सहायक विभागीय अधिकारी शंकर पवार, रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव उत्तम आवारी आदींच्या उपस्थितीत प्राचार्य साहेबराव काळे यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान सोहळा कामशेत (ता. मावळ) येथील सुमन रमेश तुलसाणी इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणामध्ये जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात पार पडला. मुख्याध्यापकजाधव डी.जी., डुंडे एस.के., कालेकर एस. पी., जाधव डी.डी., चासकर वाय.डी. आदी यावेळी उपस्थित होते.