शैक्षणिक
जारकरवाडी जि.प.शाळेच्या मुलींचा खो खो संघ जिल्हात प्रथम
निरगुडसर प्रतिनिधी राजु देवडे
जारकवाडी ( ता.आंबेगाव ) येथील जि.प. प्राथ.शाळेच्या मुलींनी जिल्हा क्रीडा स्पर्धेत एकतर्फी विजय मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
( दि.२९) रोजी पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या जिल्हा क्रीडा स्पर्धेत जारकरवाडी जि.प.शाळेने एकहाती विजय संपादीत केला. विशेष म्हणजे बहुतेक शाळांमध्ये अनुभवी प्रशिक्षकांडुन विद्यार्थ्यांची क्रीडा तयारी करून घेतली जाते परंतु जारकरवाडी जि.प.शाळेने कोणताही प्रशिक्षक न वापरता शाळेतील शिक्षक अशोक लोखंडे सर व वैजयंती लोखंडे मॅडम व सहशिक्षक यांनी आपले कौशल्य पणाला लावून विद्यार्थ्यांची शाळेत चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली. तालुका पातळीवरील दैदिप्यमान यशानंतर जिल्हा क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळून शाळेचा जिल्ह्यात नावलौकिक मिळविला आहे. तसेच तृप्ती जयराम लबडे या विद्यार्थीनीचा लांब उडी ( लहान गट ) हिने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
मुलींचा संघ जिल्हात प्रथम आल्याची माहिती कळताच ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. विजयी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे पुणे शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड, उपशिक्षण अधिकारी रमेश चव्हाण, तालुका गटशिक्षणाधिकारी अधिकारी सविता माळी, शिक्षण विस्तार अधिकारी काळुराम भवारी, केंद्रप्रमुख कांताराम भोंडवे मुख्याध्यापक म.वि.काळे, शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी आभार मानले. यशस्वी विद्यार्थ्यांचे ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.