गावागावातुन
रांजणी गावचे ग्रामदैवत नृसिंहाचे मंदिर
शब्दांकन – पत्रकार श्री ह भ प मधुकर महाराज गायकवाड गावडेवाडी
रांजणी (ता. आंबेगाव) गावचे ग्रामदैवत श्री नृसिंह मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. देणगी रूपाने ग्रामस्थांनी मंदिरासाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च केला आहे. अजूनही मंदिराच्या किरकोळ कामांसाठी सुमारे ७५ ते ८० लाख रुपये खर्च होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. हेमांडपथीय मंदिराचा पुन्हा ग्रामस्थांनी जीर्णोद्धार करण्याचे ठरविले.
त्यानुसार २२ फेब्रुवारी २०१८ रोजी भूमिपूजन केले. तब्बल पाच वर्षे मंदिराचे काम सुरू होते ७१ बाय ७१ फूट आकाराचे हे मंदिर असून, परिसरातील सर्वांत मोठे मंदिर आहे. तळमजल्यात मोठे भक्तनिवास बांधले आहे. मंदिराच्या उत्तर दिशेला मीना नदी आहे. या बाजूने मंदिराच्या घाटाचे बांधकाम सुरू आहे. मंदिराचे रंगकाम, कळसांचे काम, विद्युत रोषणाई, नक्षीकाम पूर्ण झाले आहे..
परिसरातील जागृत देवस्थान अशी ख्याती
गावातील श्री नरसिंहाचे जागृत देवस्थान आहे. थोरले बाजीराव पेशवे हे निजामाच्या स्वारीवर जात असताना रांजणीत नरसिंहदेवाच्या दर्शनासाठी थांबले. मला लढाईत यश मिळू दे, मी मंदिराचा जीर्णोद्धार करीन, असा नवस त्यांनी भगवान नरसिंह महाराजांना केला. लढाईत थोरले बाजीराव पेशव्यांना यश मिळाले. परंतु त्यांचा पुढील काळ खडतर असाच गेला. मंदिर बांधण्याचा नवस पूर्ण करता आला नाही. नाना फडणवीसांनी हे मंदिर बांधून थोरले बाजीराव पेशव्यांचा नवस पूर्ण केल्याची आख्यायिका सांगितली जाते.
अतिशय जागृत असलेले रांजणी ता आंबेगाव येथील हे नृसिंह महाराज आहेत जवळजवळ तब्बल तीन कोटी रुपये खर्चून लोकवर्गणीतून व लोकसहभागातून या मंदिराची उभारणी केलेली आहे राज्यातील व परराज्यातील लोकही या देणगीमध्ये सहभागी आहेत या मंदिराचा कलशारोहण बुधवार ता . ६ मार्च रोजी होणार आहे तीन मार्चपासून कथा कीर्तन महाप्रसाद असे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावावी.
खंडू शिवराम भोर .
विश्वस्त श्री लक्ष्मी नृसिंह मारुती व भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट रांजणी