गावागावातुन
निरगुडसर ता.आंबेगाव गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सुरेश टाव्हरे
निरगुडसर प्रतिनिधी(राजु देवडे)
निरगुडसर ( ता. आंबेगाव) येथील गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी सुरेश हरीभाऊ टाव्हरे तर उपाध्यक्ष पदी अजिंक्य पोखरकर यांची निवड करण्यात आली आहे. २६ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात करण्यात आली.
यावेळी तंटामुक्ती समितीचे पुनर्गठन करताना सर्वानुमते अध्यक्ष पदासाठी सुरेश हरिभाऊ टाव्हरे तर उपाध्यक्ष अजिंक्य दत्तात्रय पोखरकर यांची निवड करण्यात आली. यावेळी ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रविंद्र वळसेपाटील होते. ग्रामसभेस उपसरपंच अशोक टाव्हरे, पोलीस पाटील विठ्ठल वळसेपाटील, ग्रामविस्तार अधिकारी पांढरे, मा. उपसरपंच आनंदराव वळसे पाटील, ग्रा.प. सदस्य भाऊसाहेब वळसेपाटील, वैभव वळसे पाटील, राहुल हांडे, अशोक कानसकर, ग्रामपंचायत सदस्य पुजा थोरात, सारिका कडवे, अक्षदा टाव्हरे, संगीता हिंगे, बाबाजी टाव्हरे, गणपत वळसे पाटील, बाळासाहेब वळसे पाटील, नवनाथ टाव्हरे, विक्रम मेंगडे, कैलास वळसे पाटील, कमलेश वळसे पाटील, अमर गायकवाड, रामचंद्र हांडे, हरीष सुडके, चंद्रकांत गायकवाड, विकास वळसे पाटील, राजेश वळसे पाटील, सागर राऊत, महेश राऊत, प्रकाश कडवे, अनिकेत तुळेकर, सुभाष टाव्हरे, गणेश किरे, विकास कडवे, सुयोग टेमकर यासह ग्रामस्थ उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आजी, माजी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते .