सामाजिक
धामणीत येथे मराठा समाजाचा जल्लोष, फटाके फोडून केला आनंदोत्सव साजरा
निरगुडसर प्रतिनिधी( राजु देवडे)
मराठा समाजाच्या लढ्याला मोठे यश मिळाल्याने धामणी ( ता.आंबेगाव ) येथील वरच्या चौकात धामणी , पहाडदरा, शिरदाळे ज्ञानेश्वरवस्ती येथील मराठा समाज बांधवांनी एकत्र येत मोठा जल्लोष केला व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला
राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत त्यासंदर्भाने अध्यादेश काढले आहेत. त्यानंतर आंबेगाव तालुक्यातील अनेक गावात सकल मराठा समाज बांधव, भगिनी मोठ्या संख्येने एकत्र जमले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करुन आनंदोत्सव साजरा केला.
सकल मराठा समाज बांधव अनेक गावात मोठ्या संख्येने एकत्र जमले व एकमेकांना नागरिकांनी पेढे, जिलेबी, लाडू भरवून तसेच फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.