गावागावातुन
आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे येथील योगेश यमनाजी पुंडे १९ वर्षे सैन्यदलाल देशसेवा पुर्ण करुन सेवानिवृत्त झाल्याबददल मित्र परीवाराने केला सक्तार सभारंभ.
मंचर प्रतिनिधी-
आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे गावच्या शेतकरी कुंटुबातील युवक योगेश यमनाजी पुंडे यांनी सैन्यदलात १९ वर्षे पुर्ण केल्याबददल त्यांचा सक्तार सभारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी देवदत्त निकम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
पुंडे परिवारातील योगेश पुंडे या युवकानाने १९ वर्ष सैन्य दलात देशाची सेवा केली.आपण केलेली सेवेचा सार्थ अभिमान कुटुंबीय,ग्रामस्थ व मित्र परीवगराला आहे.खडतर जीवन प्रवास करताना मित्रपरिवार, कुटुंब, गाव आणि आपली माणसं जपण्याचे कायम काम योगेश यांनी केले .
यावेळी भिमाशंकर कारखान्याचे मा.चेअरमन देवदत्त निकम ,पारगावच्या सरपंच श्रेता किरण ढोबळे,वसंतराव हिंगे,फकिरा वळसे ,सचिन हिंगे,प्रमोद वळसे,संजय बढेकर,बजरंग देवडे,किरण ढोबळे,सचिन देवडे,सुधिर ढोबळे, सागर लोखंडे,बाळा शेवाळे,प्रकाश ढोबळे, पु़ंडे परिवारातील सर्व सदस्य,पारगाव व अवसरी गावातील विविध पदाधिकारी ,माजी सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.