सामाजिक
अवसरी खुर्द च्या जोगेश्वरी महिला बचत गटाच्या वतीने पहाडदऱ्यातील आदिवासी महिलांना थंडीच्या दिवसात ब्लॅकेटचे वाटप करून दिली मायेची ऊब
निरगुडसर प्रतिनिधी -राजु देवडे
पहाडदरा ( ता. आंबेगाव) येथील ठाकरवाडीतील आदिवासी ठाकर समाजातील महिलांच्यामध्ये जाऊन हळदी कुंकवाचे आयोजन करून अवसरी खुर्द (ता. आंबेगाव )येथील जोगेश्वरी महिला बचत गटाच्या महिलांनी एकूण १०० आदिवासी महिलांना थंडीच्या दिवसात ब्लॅकेटचे वाटप समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
अवसरी खुर्द येथील जोगेश्वरी महिला बचत गटाच्या महिलांनी एकत्र येत ठाकरवाडीत जाऊन दुसऱ्यांच्या शेतावर रोजंदारीने कामावर जाणाऱ्या आदिवासी समाजातील महिलांसाठी हळदी कुंकवाचे आयोजन केले होते.यावेळी १०० महिलांना थंडीच्या दिवसात उपयोगी पडणारे ब्लॅकेट वाटप करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
त्याचबरोबर पौष्टिक राजगिरा लाडुचे पाकीट वाण म्हणून दिले यावेळी धामणीच्या सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, उद्योजिका मोनिका करंजखेले, पहाडदऱ्याच्या माजी ग्रामपंचायत सदस्या सविता वायकर उपस्थित होत्या
कार्यक्रमाचे नियोजन जोगेश्वरी बचत गटाच्या अध्यक्षा निर्मला बिडकर, सचिव रेश्मा शिंदे, प्रतिभा खेडकर, सुषमा भोर, भाग्यश्री बिडकर, स्वाती पवार, जया शिंदे, राजश्री शिंदे, प्रमिला शिंदे, राजश्री ढेपे, प्रियंका टेमकर, साक्षी शिंदे यांनी केले होते.