शैक्षणिक
दत्तात्रय गोविंदराव वळसे पा. महाविद्यालयाचे पहाडदरा येथे श्रम संस्कार शिबिर
निरगुडसर प्रतिनिधी( राजु देवडे)
पहाडदरा ( ता.आंबेगाव ) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भीमाशंकर शिक्षण संस्था संचलित द.गो.वळसे पाटील महाविद्यालयाचे पहाडदरा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास अंतर्गत लोकसंख्या नियंत्रण जनजागृती विशेष श्रमसंस्कार शिबिर २३ जाने.ते.२९ जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहे.
भिमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी श्रम संस्कार शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शिबीरात युवा व्याख्याते दत्तात्रय कुलट, डॉ. श्रीकांत फुलसुंदर रा.स.यो जिल्हा समन्वयक,नारायणगाव, सचिन वाघ नायब तहसीलदार आंबेगाव, लहु थाटे सर.पो.नि.पारगाव का, प्रमिला वाळुंज बी.डी.ओ. प.स.आंबेगाव यांची व्याख्याने पार पडणार आहे.
यावेळी प्रदीप वळसे पाटील म्हटले की, राष्ट्रीय सेवा योजना हा शालेय जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. या शिबिरातुन विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त लागत तसेच या शिबिराच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. सतत तीन वर्ष पहाडदरा येथे हे शिबिर संपन्न होत असून हे शिबिराचे दुसरे वर्ष असल्याचे प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले.
यावेळी भिमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे , व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, भगवानराव वाघ, सर.पो.नि.लहु थाटे,संकेत वायकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमा प्रसंगी कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, बाळासाहेब घुले, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, पोपट थिटे, ख.वि.संघाचे माजी अध्यक्ष भगवान वाघ, सरपंच मच्छिंद्र वाघ, उपसरपंच कैलास वाघ, संस्थेचे कार्यालीन सचिव वसंत जाधव, ग्रामपंचायत सदस्य संकेत वायकर, रुपाली वाघ, विनोद वायकर, ग्रामसेवक जाधव मॅडम, विद्यार्थी, कार्यक्रम अधिकारी प्रा.राहुल डोळस, प्रा.संजीवनी टाके व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मे. थोरात सर यांनी केले तर सूत्रसंचालन राहुल डोळस सर कार्यक्रम अधिकारी यांनी केले तर आभार बी.डी.चव्हाण सर यांनी मानले.