गावागावातुन

थापलिंग यात्रेला उत्साहात प्रारंभपहिल्या दिवशी एक लाख भाविकांनी घेतले खंडोबा देवाचे दर्शन

Published

on

मंचर प्रतिनिधी-

पौष पोर्णिमेनिमित्त लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील नागापूर येथील .श्री .क्षेत्र थापलिंग खंडोबा देवाच्या यात्रेला गुरुवारी (दि. २५ ) उत्साहात प्रारंभ झाला. ” सदानंदाचा येळकोट ” भैरवनाथाचं चांगभलं ” या जयघोषात यात्रेच्या पहिल्या दिवशी सुमारे एक लाख भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले. ‘येळकोट येळकोट जय मल्हार ‘ करत भाविकांनी तळीभंडार केला .


पुणे आणि नगर जिल्ह्यातील लाखो भाविक थापलिंग यात्रेला दर्शनासाठी येतात . पौष पोर्णिमेला येथे मोठी भरते . यंदा २५ व २६ जानेवारी असे दोन दिवस यात्रा आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे खंडोबा देवाची विधीवत पुजा , अभिषेक करण्यात आला . त्यानंतर गडावर भाविकांनी जागरण गोंधळ करून आपल्या कुलदैवताचा कुलाचार पुर्ण केला . दुपारी गडावर चोहोबाजुंनी भाविक येण्यास सुरुवात झाली . दुपारी १२ वाजता वळती , रांजणी येथिल खुडे बंधूंच्या काठी पालख्यांचे गडावर वाजत गाजत आगमन झाले. गडावर जिलेबी भजी , शेव रेवडी ची हॉटेल , रसवंती गृहे , खेळण्यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली आहेत. दर्शनानंतर भाविकांनी जिलेबी भजी , शेव रेवडीचा आस्वाद घेतला.
गडावर यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे . थापलिंग गडावर भाविकांसाठी राजगुरुनगर , नारायणगाव आगारामधून जादा बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत . शुक्रवारी (दि. २६ ) थापलिंग गडावर भरयात्रा भरणार आहे . यादिवशी पुन्हा एक ते दिड लाख भाविक दर्शना साठी येतील .असा अंदाज देवस्थान ट्रस्टने केला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version