सामाजिक
पारगाव (शिंगवे) ता. आंबेगाव येथे मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिलांसाठी आरोग्य शिबिर व हळदीकुंकु कार्यक्रमाचे आयोजन.
मंचर प्रतिनिधी-
पारगाव (शिंगवे) ता. आंबेगाव येथे मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिलांसाठी आरोग्य शिबिर व हळदीकुंकु कार्यक्रमाचे आयोजन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याठिकाणी ग्रामपंचायत पारगाव शिंगवे ,मोरया युवा प्रतिष्ठान व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्ममाने हळदी कुंकु व आरोग्य तपासणी करण्यात आली .यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
गावाच्या विकासासाठी सर्व महिलांनी एकत्र आलं पाहिजे व आपल्या पुढील व गावा पुढील असणाऱ्या अडचणी सोडविण्याचे काम केलं पाहिजे,असे प्रतिपादन सरपंच श्रेता ढोबळे यांनी केले
यावेळी गावातील विधवा महिलांचां विषेश सन्मान करण्यात आला.महिलांना यावेळी. आंब्यांचे रोपे देण्यात आली,सर्व महिलांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी सरपंच श्वेता ढोबळे, शैलजाताई ढोबळे,प्रज्ञा कुलकर्णी,ग्रामपंचायत सदस्या रोहिणी देवडे,अंकिता लोखंडे,गितांजली लोंढे,राजश्री ढोबळे,लता ढोबळे,प्रियंका ढोबळे,गौरी ढोबळे, रेखा लबडे,डाॅ भोर ,डाॅ,सहाणे व ग्रामविकास अधिकारी के. डी.भोजणे ,ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ महिला उपस्थित होते.