गावागावातुन
पारगाव ( शिंगवे) येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन.
मंचर प्रतिनीधी-
गाव कारखाना येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान हे खुप मोठे आहे. त्याचप्रमाणे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मानसासाठी मोठे योगदान दिले आहे. या दोनही महापुरुषांच्या जयंती निमित्त पारगाव शिंगवे येथे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी सरपंच श्चेता ढोबळे,शाखाप्रमुख श्रीकांत लोंखंडे,ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे,रोहिणी देवडे,बजरंग देवडे,तेजस जगताप ,साहिल लबडे,तुषार दातीर,प्रथमेश गावडे,ग्रामपंचायत कर्मचारी सुधिर ढोबळे,रवी ढोबळे ,बाबु जाधव ,विजया शेलार व शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.