गावागावातुन
मेंगडेवाडीत शिवसेनाप्रमुखांना मानवंदना.
निरगुडसर प्रतिनिधी (राजु देवडे)
मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना ९७ व्या जयंती निमित्त शिवसैनिकांनी पुष्पहार अर्पण करून नारळ फोडून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्राचे लाडके नेते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे हृदय जिंकले होते, त्यांनी मराठी बाणा कायम ठेवला होता, आपल्या भाषणांतून त्यांनी मराठी माणसांना प्रभावित केलं होतं. तसेच कायम मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढले
बाळासाहेब ठाकरे याचं स्वप्न होत की, आयोध्येमध्ये भव्य दिव्य प्रभू श्रीराम मंदीर उभारण्याच त्यांचे स्वप्न साकार झाले आणि देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात भारतीयांनी आनंदोत्सव साजरा केला. असे युवसेना जिल्हा समन्वयक सुनील गवारी यांनी सांगितले.
यावेळी माजी उपसरपंच अंकुश मेंगडे, अशोक वायाळ, संदीप गवारी, बंडू अरगडे, अवधूत मेंगडे, व शिवसैनिक उपस्तीत होते.