गावागावातुन
शिरदाळे ग्रामस्थांकडून मराठा आंदोलनातील आंदोलकांसाठी भाकरी ,चपाती, चटणी ,भाजी या खाद्यपदार्थांची व्यवस्था .
निरगुडसर प्रतिनिधी (राजु देवडे)
मनोजदादा जरांगे पाटील यांनी जालना येथील अंतरवली सराटी येथून मराठ्यांच्या हक्काच्या आरक्षणासाठी मुंबईकडे प्रस्थान केले आहे.
मजल दर मजल करत लाखो आंदोलक जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आंदोलनाच्या मार्गावरील अनेक गावातील ग्रामस्थांनी जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत करून ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने चहा, नाष्टा, जेवण, पाणी यांची सोय करत आहे.
( दि.२२) रोजी पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती या ठिकाणी जरांगे पाटील व मराठा आंदोलक मुक्कामी थांबणार आहे. मराठा आंदोलकांना जेवणासाठी शिरदाळे ( ता.आंबेगाव ) येथील ग्रामस्थांनी भाकरी,चपाती,शेंगदाणा,चटणी_मेथीची,भाजी,लसणाची चटणी, असा आहार शिरदाळे येथील हनुमान मंदिरात जमा केला.
शिरदाळ्याचे उपसरपंच बीपीन चौधरी, कु.अनिकेत चौधरी यांनी हा आहार कारेश्वर मंदिर कारेगाव ( ता . शिरूर,) येथील सरपंच निर्मलाताई नवले,उपसरपंच संदीपभैया नवले यांच्याकडे सुपूर्द केले आहे.