गावागावातुन
पोंदेवाडीचा विकास कौतुकास्पद – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील.
निरगुडसर प्रतिनिधी-( राजु देवडे)
पोंदेवाडी ( ता.आंबेगाव ) येथील ग्रामस्थांनी केलेली विकास कामे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काढले.
शनिवार ( दि.२० ) रोजी पोंदेवाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ वळसे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते.
यावेळी जि.प.माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील,बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, शिवाजी ढोबळे, मनोज रोडे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश थोरात, सहाय्यक बि.डी.ओ.अर्चना कोल्हे,खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, बाळासाहेब घुले, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर,ख.वि.संघाचे माजी अध्यक्ष भगवान वाघ, शरद बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, थोरांदाळे़ सरपंच जे.डी. टेमगिरे पारगावचे सरपंच श्वेता ढोबळे, मांदळेवाडी सरपंच उज्वला आदक,काठापुर सरपंच अशोक करंडे, लाखणगाव सरपंच प्राजक्ताताई रोडे पाटील,पोंदेवाडी सरपंच निलम वाळुंज, सोसायटी चेअरमन विठ्ठल मखर, उपसरपंच महेंद्र पोखरकर, संदीप पोखरकर, निलेश पडवळ,अमोल वाळुंज, सचिन टाव्हरे, राजु सिनलकर, मयूर सरडे, संकेत वायकर ,प्रतिक जाधव,शिराम वाळूंज महेंद्र वाळुंज पोंदेवाडी ग्रामपंचायत सर्व सदस्य, सोसायटी सर्व सदस्य व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वळसे पाटील आपल्या भाषणात म्हटले की, केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याची काम केले पाहिजे. गेली तीस ते पस्तीस वर्षे या परिसरात विकासाची कामे केल्याने तुम्ही मला या भागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. यापूर्व काळात अनेक काळात अनेक कार्यकर्त्यांना विविध संस्थेवर काम करण्याची संधी दिली. आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला शेतीविषयक धोरण ठरवावे लागणार आहे. पोंदेवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार पोंदेवाडी बैलगाडा घाटासाठी वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. वळसे पाटील यांनी बैलगाडा घाटासाठी निधी उपलब्ध करून देत असताना शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे असून पालकांनी विद्यार्थ्याकडे लक्ष ठेवले पाहिजे. असे यावेळी सांगितले. येणाऱ्या काळात राजकारणात उलटा पालट घडण्याची शक्यता वळसे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.सर्व उपस्थितीतांचे स्वागत व केलेल्या कामाची माहिती यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी दिली.