गावागावातुन
पारगाव कारखाना ( ता .आंबेगाव) गावठाणात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात गतिरोधक बसविल्याने नागरिकांमधे समाधान.
मंचर प्रतिनिधी-
पारगाव कारखाना ( ता .आंबेगाव) गावठाणात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात गतिरोधक बसविण्यात आले आहे यामुळे ग्रामस्थ व शाळकरी मुलांनी समाधान व्यक्त केले आहे.
गतिरोध बसवल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.गतिरोधक बसविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशाससाने वारंवार पाठपुरावा केला होता. गतिरोधक बसवल्यामुळे वाहनांचा वेग कमी होणार आहे.
पारगाव येथे असनारा भिमाशंकर सहकारी साखर कारखाना व पारगाव गावातुन जानारा अष्टविनायक महामार्ग यामुळे मोठी वर्दळ याठिकाणी असते.तसेच पारगाव हि महत्त्वाची बाजारपेठ असल्याने मोठ्या प्रमाणावर लोकांची ये जा असते त्यामुळे येथे गतिरोधकांची गरज होती.
यावेळी पारगाव गावच्या सरपंच श्रेता ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे ,काळुराम लोखंडे,विठठल ढोबळे,अंकिता लोखंडे,बजरंग देवडे,सागर लोखंडे,स्वत्नील लोखंडे,साहेबराव शिंदे,रोडेमामा,विलास पडघमकर,संजय देठे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.