सामाजिक
बेल्हा-जेजुरी एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करा.अनिल वाळुंज यांची माघणी
निरगुडसर प्रतिनिधी (राजु देवडे):
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून महामार्ग क्रमांक ११७ बेल्हा ता.जुन्नर ते -जेजुरी ता.पुरंदर या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे या महामार्गावर नारायणगाव आगाराकडुन बेल्हा -जेजुरी बससेवा सुरू झाली होती .परंतु अचानक ही बससेवा बंद झाल्याने शालेय विद्यार्थी, रांजणगाव, सणसवाडी येथे जाणारे कामगार व कुलदैवत जेजुरीला जाणाऱ्या भाविकांची अडचण होत आहे.त्यामुळे बंद झालेली बेल्हा ते जेजुरी हि बससेवा पुर्ववत सुरू करावा अशी मागणी आंबेगाव तालुका ख. वि. संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.
राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला बससेवा पूर्ववत सुरू करण्याबाबतचे निवेदन देणार असल्याचे वाळुंज यांनी सांगितले. सदर महामार्ग जुन्नर, आंबेगाव, शिरूर, हवेली, पुरंदर या तालुक्यातून जात आहे. या रस्त्यावरील दळणवळणा बरोबर प्रवासी संख्या
ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे बेल्हा जेजुरी या महामार्गावर लवकरात लवकर बस सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी वाळुंज यांनी केली आहे.