गावागावातुन
पारगाव शिंगवे येथील बचत गटातील महिलांनी केले कळसूबाई शिखर सर.
निरगुडसर प्रतिनिधी (राजु देवडे)
पारगाव कारखाना ( ता.आंबेगाव ) येथील चिचगाईमाता बचत गटातील महिलांनी केले कळसुबाई शिखर सर केले आहे.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने पारगाव येथील चिचगाई मळ्यातील चिचगाईमाता बचत गटातील पंधरा महिलांनी कळसुबाई शिखर सर करत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
यामध्ये लता ढोबळे, ऋतुजा ढोबळे, ज्योती मुंडे, सोनाली ढोबळे, रेणुका ढोबळे, अनिता ढोबळे, शारदा ढोबळे, अलका ढोबळे, आणि प्रांजल ढोबळे सहभागी झाल्या होत्या त्यामध्ये काही महिला साठ वय झालेले असून देखील कळसुबाई शिखर 1660 मिटर उंची सर केल्याने त्यांचे पारगाव ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.