गावागावातुन
पारगाव शिंगवे या ठिकाणी श्री रंगदासस्वामी महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी
मंचर प्रतिनिधी-
पारगाव शिंगवे ता.आंबेगाव या ठिकाणी श्री रंगदासस्वामी महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
यावेळी सर्व ग्रामस्थांना आमटी भाकरीचा महाप्रसाद देण्यात आला .
श्री रंगदासस्वामी महाराज प्रतिमा पुजन व आरती झाली यावेळी ह.भ.प.निवृती महाराज लोखंडे यांचा प्रवचनाचा कार्यक्रम झाला .यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी सरपंच श्वेता किरण ढोबळे,उपसरपंच नितीन ढोबळे ,ग्रामपंचायत सदस्या रोहिणी देवडे ,सोनबा ढोबळे ,शरद कुलाळ ,दत्तात्रय देवडे आणा ,अनिता भागंचंद पोंदे ,निवृती लोखंडे,हे उपस्थित होते सर्वाचे स्वागत भरत कोल्हे व भाग्यश्री कोल्हे यांनी केले .