महाराष्ट्र
मैत्रीपेक्षा या जगात सर्वश्रेष्ठ असे काहीच नाही. माणसाला आयुष्यात एक तरी चांगला मित्र असावा.कवी अनंत राऊत
मंचर प्रतिनिधी-
मैत्रीपेक्षा या जगात सर्वश्रेष्ठ असे काहीच नाही. माणसाला आयुष्यात एक तरी चांगला मित्र असावा .कोरोनाच्या काळात सर्व लोक दुर जात होते.अशावेळी मित्रच मदतीला धावून येत होते. इतर नाती ही तुमच्या जन्माने तुम्हाला मिळतात.परंतु मित्र हे नातं मात्र तुम्हाला तुमच्या संगतीने सोबतीने मिळतं आणि ते आयुष्यभर तुमच्या सोबत राहतं. चांगला मित्र असेल तर माणूस कधीच आत्महत्या करणार नाही.असे प्रसिद्ध कवी अनंत राऊत म्हणाले.
मंचर( ता. आंबेगाव) येथे आंबेगाव विचार मंच,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव तालुका,संतोषभाऊ भोर युवा मंच यांच्या वतीने शरदचंद्र पवार सभागृह याठिकाणी आयोजित कवी संमेलना प्रसंगी अनंत राऊत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष अंकित जाधव,मंचर शहर अध्यक्ष सुहास बाणखेले, आंबेगाव विचार मंचाचे अध्यक्ष ओंकार कराळे, कवी दत्ता पायमोडे, विशाल करंडे ,संतोष गाढवे, स्वराज्य कलाकार महासंघाचे अध्यक्ष रामदास करंडे,मनोज शिंदे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना कवी अनंत राऊत यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपल्या कवितेतून भाष्य केले.मित्र वनव्यामध्ये गाराव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, त्याचप्रमाणे भोंगा या कवितांनी रसिकांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे प्रस्तावित अध्यक्ष अंकित जाधव,सूत्रसंचालन संतोष गाढवे ,स्वागत ओंकार कराळे, तर आभार सुहास बाणखेले यांनी मानले. यावेळी 35 कवींनी वेगवेगळ्या विषयावर आपल्या रचना सादर केल्या.