गावागावातुन
लोणी ता.आंबेगाव येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
लोणीत राजमाता जिजाऊ जयंती साजरी
निरगुडसर प्रतिनिधी (राजु देवडे)
लोणी ( ता.आंबेगाव ) येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या कार्याची प्रेरणा आपल्याला आजही मिळते. शिवरायांना त्यांनी बालपणापासूनच दिलेले संस्कार, त्यांचे केलेले संगोपन, त्यांना दिलेलं प्रेम, आदर, शिक्षण यामुळे भारत भूमीला छत्रपती शिवाजी महारांजा सारखा जाणता राजा लाभला.असे लोणीचे सरपंच सावळाराम नाईक म्हणाले.
लोणी ता आंबेगाव येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.
आई आणि मुलाचे नाते कसे असावे हे ही आपण जिजाऊ आणि शिवरायांकडून शिकतो. कठीण प्रसंग आला तरी त्याला सामोरं जाण्याचे बळ कसे विकसित करावे हे जिजाऊंनी वेळोवेळी शिवरायांना शिकवले. त्यांच्या संगोपनात त्यांनी मजबूत केलेला शिवरायांचा आत्मविश्वास, घडवलेले व्यक्तिमत्त्व यामुळे आज 350 वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराजां विषयीचे कुतूहल, त्यांच्याबद्दलचा आदर, प्रेम आजही आपल्या समाजात टिकून आहे.
या कार्यक्रमा प्रसंगी लोणीचे लोकनियुक्त सरपंच सावळाभाऊ नाईक, दिलीप वाळुंज, बाळासाहेब आदक, बबन वाळुंज, हैबत आढाव व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.