महाराष्ट्र
भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
निरगुडसर प्रतिनिधी –राजु देवडे
दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु, यांचा राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु, यांचा सन २०२१-२२ करीता मध्य विभागातील प्रथम क्रमांकाचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार” व सन २०२२-२३ करीता मध्य विभागातील द्वितीय क्रमांकाचा “तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार” देशाचे माजी कृषीमंत्री व वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे अध्यक्ष मा.खा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
गुरुवार (दि. ११ ) वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी बु., येथे ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये राज्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना सन २०२२-२३ गाळप हंगामासाठी सर्वोत्कृष्ठ सहकारी साखर कारखाना, उत्कृष्ठ ऊस विकास व संवर्धन, उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन, ऊस उत्पादक शेतकरी, सहकारी साखर कारखान्यांचे अधिकारी यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री व वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे उपाध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री जयंतराव पाटील, बाळासाहेब पाटील, हर्षवर्धन पाटील, विश्वजीत कदम, दिलीपराव देशमुख, , नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि. अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे, साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि. कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे महासंचालक संभाजी कडू पाटील, सल्लागार शिवाजीराव देशमुख तसेच साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, संचालक देवदत्त निकम, अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, अंकित जाधव, अरुण चासकर, अक्षय काळे, बाजीराव बारवे, सिताराम लोहोट, ज्ञानेश्वर अस्वारे, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे, , पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, टेक्नीकल मॅनेजर शिरीष सुर्वे, प्रोसेस मॅनेजर किशोर तिजारे, चिफ अकौंटंट राजेश वाकचौरे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, ऊस विकास अधिकारी विकास टेंगले यांनी स्विकारला.
याबाबत अधिक माहिती देताना बेंडे म्हणाले साखरेचा प्रति क्विंटल रोखीचा उत्पादन प्रक्रिया खर्च तसेच एकूण उत्पादन प्रक्रियेचा खर्च व खेळते भांडवलावरील व्याजाचा खर्च राज्याच्या सरासरी खर्चापेक्षा कमी आहे. इतर कारखान्याच्या तुलनेत स्टोअर खरेदी व्यवस्थापन चांगले असल्याने सन २०२१-२२ करीता मध्य विभागातील प्रथम क्रमांकाचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार” तसेच मिलमधील उसाचा तंतुमय निर्देशांक, रिड्युस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन, साखर तयार करण्यासाठी लागणा-या वाफेचा व विजेचा कमीत कमी वापर, साखर उत्पादन प्रक्रीयेमध्ये बगॅस वापर कमी आहे. गाळप क्षमतेचा वापर योग्य प्रकारे करून बगॅस बचत, साखरेच्या व्येयामध्ये घट व देखभाल दुरुस्ती खर्चात काटकसर केल्याने सन २०२२-२३ करीता मध्य विभागातील द्वितीय क्रमांकाचा “तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार” असे पुरस्कार देण्यात आले आहेत.
सदर पुरस्कार प्राप्त होणेस कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचा-यांचे सुयोग्य व्यवस्थापन, सभासद व ऊस उत्पादक शेतकरी वर्गाची साथ यामुळेच शक्य झाले आहे. कारखान्यास देश पातळीवरील १२ व राज्य पातळीवरील १४ असे एकूण २६ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार ५ वेळा प्राप्त करणारा एकमेव कारखाना ठरला असल्याची माहिती व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी दिली