गावागावातुन
वधू वर परिचय मेळावा काळाची गरज : सरपंच डॉ शुभदा वाव्हळ
नारायणगाव प्रतिनिधी
“भारतरत्न डॉ.आंबेडकर प्रतिष्ठानकडून नेहमीच अत्यंत कौतुकास्पद कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.समाजाला आज या गोष्टीची गरज आहे , ती गरज लक्षात घेऊन डॉ.आंबेडकर प्रतिष्ठान उपक्रम राबवत आहे.वधु वर परिचय मेळावा ही हल्लीच्या काळात अत्यंत गरजेची बाब आहे.”असे प्रतिपादन नारायणगावच्या लोकनियुक्त सरपंच डॉ.शुभदा वाव्हळ यांनी केले.
नारायणगाव येथील जयहिंद मंगल कार्यालयात डॉ.आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी बौद्ध समाजातील वधू-वरांचा व पालकांचा राज्यस्तरीय परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.वाव्हळ बोलत होत्या.
यावेळी नायब तहसीलदार सुधीर वाघमारे ,आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते के.बी.वाघमारे , सतीश कसबे , आरपीआयचे तालुकाध्यक्ष पोपट राक्षे , शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप जोशी , प्रा.सुधीर रोकडे , नळावणे गावच्या सरपंच अर्चना उबाळे आदी मान्यवरांची भाषणे झाली.डॉ.शिवाजी सोनवणे , डॉ.राजेश खळे , कृष्णा खंडे , संजय जंजाळ , वंचित आघाडीचे गणेश वाव्हळ , अंजनकुमार ठोसर , बौद्धाचार्य पुनम दुधवडे , अतिश उघडे , अरविंद पंडित , संग्राम सोनवणे , डॉ.आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश बिंबाजी वाव्हळ , उपाध्यक्ष राजेंद्र रणदिवे , सचिव अशोक खरात, खजिनदार उमेश वाघांबरे , संचालक ॲड.पंकज खरात , संदीप खळे , मंगेश वाघमारे , बाळा वाव्हळ , अमर सोनवणे , आदी मान्यवर उपस्थित होते.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुध्द यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.या वधू वर परिचय मेळाव्यात सुमारे १५० इच्छूक उमेदवारांनी आपले परिचय पत्र दाखल केले.कार्यक्रमासाठी वंदना वाघचौरे , सपना वाव्हळ , सारिका कांबळे , गणेश सोनवणे , शंकर रोकडे , संदिप उबाळे , अक्षय वाव्हळ , संकेत क्षीरसागर ,प्रज्वल भालेराव यांनी परीक्षम घेतले.प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विलास कडलक यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.रवींद्र तोरणे , अमोल गायकवाड यांनी उमेदवारांच्या परिचय पत्रांचे वाचन केले.